Honda Activa : जबरदस्त फीचर्स असणारे Honda Activa चे इलेक्ट्रिक मॉडेल ‘या’ दिवशी होणार लाँच

Ahmednagarlive24 office
Published:

Honda Activa : होंडाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच ही कंपनी Honda Activa चे जबरदस्त फीचर्स असणारे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच करणार आहे.

दरम्यान कंपनीची स्वॅप करण्यायोग्य बॅटरी असलेली ही पहिली इलेक्ट्रिक दुचाकी असण्याची शक्यता आहे. येत्या 23 जानेवारीला कंपनीचे हे मॉडेल लाँच केले जाण्याची शक्यता आहे.

सुरु आहे अफवा?

कंपनी Activa चे हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेरियंट सादर करेल असा काही रिपोर्ट्समध्ये दावा केला आहे. दरम्यान कंपनीने याबाबत एक टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये ‘एच-स्मार्ट’चा लोगो दिसत आहे. ज्यामुळे असे सूचित होत आहे की, कंपनी बाजारात Activa Hybrid Electric लाँच करू शकते. कंपनीने आपल्या काही मॉडेल्समध्ये होंडा इको टेक्नॉलॉजी (एचईटी) वापरली आहे. या स्कूटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञान पाहायला मिळेल.

बॅटरी-स्वॅपिंग

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर त्यात स्वॅप करण्यायोग्य बॅटरी देण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) सह भागीदारीत आपली बॅटरी-स्वॅपिंग सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली होती.

सुरुवातीला नवीन सेवेचा वापर इलेक्ट्रिक ऑटो रिक्षांसाठी करणे अपेक्षित होते.आता कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसह लॉन्च करण्याची शक्यता आहे. दरम्यान स्वॅप करण्यायोग्य बॅटरी असलेली ही पहिली इलेक्ट्रिक दुचाकी असण्याची शक्यता आहे.

मिळणार दमदार फीचर्स

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात इंडिकेटर माउंटेड फ्रंट ऍप्रॉन, फ्लॅट सीट, सिल्व्हर कलर रेल, सीटखाली काढता येणारी बॅटरी यांसारखी फीचर्स मिळू शकतात. कंपनीची ही स्कूटर आंतरराष्ट्रीय बाजारात वेगवेगळ्या डिझाईन्स आणि किमतींसह ऑफर करण्याची शक्यता आहे.

ही स्कूटर TVS iQube इलेक्ट्रिक, Simple Energy One, Ather 450X आणि Bounce Infinity E1 शी स्पर्धा करू शकते.परंतु, ते मॉडेल इलेक्ट्रिक आहे की नाही, हे 23 जानेवारीला समजेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe