मुंबईतील प्रसिद्ध राणीबाग उद्यापासून सर्वसामान्यांसाठी खुली होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-मुंबईकरांची प्रतिक्षा संपली असून लॉकडाऊननंतर उद्या राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय पुन्हा खुलं होणार आहे. दरम्यान प्राणिसंग्रहालयातील शक्ती आणि करिश्मा वाघ यावेळी राणीबागेतील खास आकर्षण असणार आहेत.

तसेच उद्यापासून राणीबागेत अस्वल, तरस, कोल्हे, बिबट्या यांचेही दर्शन मिळणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पण, पर्यटकांना यासाठी नियमावली पाळावी लागणार आहे.

12 फेब्रुवारी, 2020 रोजी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात औरंगाबाद येथील सिद्धार्थ गार्डन व प्राणिसंग्रहालयातून पट्टेरी वाघांच्‍या एका जोडीचे आगमन झाले आहे.

अशी असणार नियमावली :-

  • कोविड-19 विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आलंय.
  • विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, 5 वर्षांखालील मुले यांनी शक्यतो भेट देणे टाळावे अशी सूचना पालिकेनं केलीय.
  • वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात प्रवेश करताना मास्कचा वापर अनिवार्य असेल.
  • वाहनधारकांनी प्रवेशद्वाराजवळ वाहनांची चाके निर्जंतुकीकरण फवारणी करूनच प्राणिसंग्रहालयात प्रवेश करावा.
  • कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव/संसर्ग टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि 5 वर्षांखालील लहान मुलांनी शक्‍यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे अथवा विशेष काळजी घ्‍यावी.
  • विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तिकीट खिडकीजवळ आखून दिलेल्या जागेवरच रांगेत उभे राहावे. गर्दी करू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.
  • प्राणिसंग्रहालयात येताना सोबत कमीत कमी वस्तू/साहित्य आणावे. विषाणू संसर्ग टाळण्यासाठी वस्तू/साहित्य जमा करून ठेवण्याची सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
  • प्रवेशद्वाराजवळ हात निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) करूनच उद्यानात प्रवेश करावा.
  • प्राणिसंग्रहालयात प्रवेश केल्यावर गर्दीने/समूहाने फिरू नये.
  • प्रदर्शनीय क्षेत्रात प्राणी पाहण्यासाठी गर्दी करू नये.
  • कोरोना विषाणू प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रदर्शनीय क्षेत्रात काचेला अथवा बॅरिकेडला स्पर्श करू नये.
  • प्राणिसंग्रहालयात केरकचरा इतरत्र टाकू नये. कचराकुंडीचा वापर करावा. कोठेही थुंकू नये.
  • एकवेळ वापराचे (सिंगल यूज) मास्क व हातमोजे इतरत्र न फेकता जागोजागी ठेवण्यात आलेल्या विशिष्ट कचऱ्याच्या डब्यात टाकावे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe