अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-मत्स्य व्यवसाय हा पारंपारिक व्यवसाय असला तरीही अनेक वैशिष्ट्यामुळे व आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे देश व जागतिक पातळीवर या व्यवसायास विषेश महत्व प्राप्त झाले आहे.
या व्यवसायाद्वारे मानवास सकस आहार व मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होते. मासळीच्या निर्यातीद्वारे देशाला मोठया प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते.
सगळेच शेतकरी मत्स्य व्यवसाय करू शकत नाहीत. असे असले तरी नैसर्गिक तळी, तलाव, पाझर तलाव आणि धरणांची जलाशये यांच्यातही मत्स्य व्यवसाय करणे शक्य झालेले आहे.
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात शेतकरी आणि मच्छिमार यांव्या जीवनात बदल करण्याचा निर्धार केला असल्याने येत्या काही दिवसांत या दोन व्यवसायात सरकारची मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता वाढली आहे.
शेततळ्यांच्या साहाय्याने व्यवसाय संधी :- शेताला पाण्याचा पुरवठा आपल्या मनाप्रमाणे करता यावा यासाठी नाही तरी तळ्यातले पाणी साठवून ठेवले जातेच.
परंतु ते पाणी उगाच साठवण्यापेक्षा त्यात जर माशांची अंडी सोडली तर जेवढा काळ पाणी साठवले जात असेल तेवढा काळ आयताच मत्स्य व्यवसाय होऊन जातो.
शेततळ्यात पाणी असेपर्यंत अशी मत्स्य शेती करावी आणि पाण्याचा वापर संपून आता शेततळे मोकळे करण्याची पाळी आली आहे असे वाटले की, आहेत तेवढे मासे काढून विकून टाकावेत आणि तळे मोकळे करावे.
पुढच्या वर्षी पुन्हा शेततळ्यात पाणी आले की, नव्याने पुन्हा माशांची अंडी विकत आणावीत आणि पाण्यात सोडून द्यावीत. पुन्हा पाणी असेपर्यंत नवा मत्स्य व्यवसाय होऊन जातो आणि पाण्याच्या संकटातून मुक्तता होण्याबरोबरच एक जोडव्यवसाय शेतकर्याला उपलब्ध होतो.
गिफ्ट तिलापिया खर्च व उत्पन्न (१ एकर तलावासाठी) :-
- – काय आहे GIFT (जेनेटकली इंप्रूव्हड फार्म्ड) तिलापिया जुनकीय सुधारित पालनयोग्य तिलापिया जातीला गिफ्ट किंवा सुपर तिलापिया असेही म्हणतात. नाईल तिलापिया (शा. नाव – Oreochromis niloticus) माशाच्या जातीपासून निवड पैदास पद्धतीने गिफ्ट तिलापिया मासा विकसित केला आहे.
- अ) स्थिर खर्च रु. मध्ये
- तलाव बांधणे १ लाख
- उपकरणे ओरिएटर, प्रयोगशाळा किट- ६० हजार
- पंप संच -२० हजार
- बर्ड नेट व क्रॅब नेट -३० हजार
- एकूण खर्च (अ) – २.१० लाख
ब) स्थिर खर्चावरील व्याज – २१ हजार :-
- (अ) अधिक (ब) २.३१ लाख
(क) चालू खर्च :-
- तळ्याची पूर्वतयारी- १० हजार
- बीज (२०,००० नग)- ६० हजार
- खाद्य १० टन (४० रु. /किलो) ४ लाख
- कामगार पगार (१८० – गुणिले -३००) ५४ हजार
- इतर खर्च ५० हजार
- एकूण (क) ५.७४ लाख ड) एकूण (अ अधिक ब अधिक क) ८.०५ लाख
- इ) माशांच्या विक्रीतून येणारे उत्पन्न (१०,००० किलो, १२० रु. प्रति किलो दर) – १२ लाख
शोभिवंत माशांचे सवंर्धन व प्रजनन :- अलीकडच्या काळात मोठया कार्यालयांमध्ये घरांमध्ये, हाॅटेलमध्ये, माॅल्समध्ये शोभीवंत माशांचे अॅक्वेरीअम ठेवले जातात. सुशोभिकरणासोबत वास्तू शास्त्रात या रंगीबेरंगी माशांना खूप महत्व आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या रंगीबेरंगी माशांना प्रचंड मागणी आहे.या माशांचे प्रजननाद्वारे मत्स्यबीज तयार करुन त्याची विक्री करता येते. काचेच्या विविध आकाराचे अॅक्वेरिअम आकर्षक स्वरुपाात तयार करता येतात.
त्यामध्ये लागणाऱ्या इतर साधंनांची उदा. रंगीत वाळू, वनस्पती, एरेटर्स, फिल्टर्सचा ही विक्री करता येते. हा व्यवसाय कमी जागे मध्ये व तुलनेने कमी भांडवलामध्ये ही करता येतो.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved