आजपासून पुन्हा शेवंताचा रात्रीस खेळ चालणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले आहे. पहिल्या दोन भागांना चाहत्यांकडून कमालीची लोकप्रियता मिळाली होती.

आता आजपासून म्हणजेच 16 ऑगस्टपासून ‘रात्रीस खेळ चाले 3’ ही मालिका पुन्हा झी मराठीवर रुजू होत आहे. 16 ऑगस्टपासून नव्या वेळेनुसार सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता या मालिकेचं प्रसारण होणार आहे.

नुकतंच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला असून, यामध्ये अण्णा नाईक आणि शेवंता दिसून येत आहे. तसेच ‘याच संसाराच्या स्वप्नामुळेच तर आज ही पाळी आली पण आता नव्याने सुरु होणार तोच रात्रीचा जीवघेणा खेळ…

‘ अशी टॅगलाईन देखील देण्यात आली. ‘अण्णा नाईक’, ‘माई’, ‘शेवंता’, ‘पांडू’ या आपल्या आवडत्या पात्रांची प्रेक्षक वाट बघत आहेत.

गेल्याच आठवड्यात पांडूची भूमिका साकारणारा अभिनेता आणि मालिकेचा लेखक प्रल्हाद कुडतरकर याने ‘रात्रीस खेळ चाले 3’ लवकरच सुरु होणार असल्याचं सांगितलं होतं. तेव्हा पासून प्रेक्षक ‘रात्रीस खेळ चाले 3’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe