सरकारने या योजनेची वाढवली मुदत; उर्वरित शेतकऱ्यांना होणार फायदा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Government scheme :- केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेल सुरुवात केली होती. त्यासाठी काही कालावधीची मर्यादाही घालण्यात आली होती. पण आता या योजनेची मुदत वाढ करण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यात सरकारने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची मुदत वाढवली असून केंद्र सरकारने डिसेंबर 2021 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला 2026 पर्यंत पाच वर्षे मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे.

तर या योजनेअंतर्गत 22 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती दिली होती,त्यामध्ये अडीच लाख अनुसूचित जाती आणि 2 लाख अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी या योजनेचा एकूण खर्च हा 93 हजार 68 कोटी एवढा खर्च करण्यात येणार आहे.

या योजनेचा मुख्य हेतु म्हणजे कमीत कमी पाण्यात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून शेतकऱ्याला आर्थिक बळ देऊन बागायतीसह कोरडवाहू शेत जमिनीला या योजनेच्या माध्यमातून पाणी मिळावे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.

भारतातील लागवडीपैकी निम्म्याहून अधिक जमिन ही केवळ पावासाच्या पाण्यावर अवलंबून होती. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीतून कमी उत्पादनात मिळते.

कारण निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम थेट उत्पादनावर होतो. त्यासाठी सिंचनाचे क्षेत्र वाढवण्यासाठी ही योजना महत्वाची ठरत आहे. 2015 मध्ये ही महत्वाची कृषी सिंचन योजना सुरु झाली होती.

त्यावेळी केवळ 6 हजार 500 कोटी हेक्टर शेतजमिन ही सिंचनाखाली होती. आणि 14 कोटी शेतजमिनीचे क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेतकरी हळूहळू या योजनेकडे वळत असून 2020-21 मध्ये या योजनेअंतर्गत 9 लाख 38 हजार हेक्टरवरील पिके सूक्ष्म सिंचनाखाली आली आहेत.

यात ठिबक आणि स्प्रिंक्लर या पध्दतीचा समावेश आहे. शिवाय या योजनेतील अनुदानात देखील वाढ करण्यात आली आहे.

आणि आता मुदत वाढ देखील करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ करून घेणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe