वाळु माफीयांनी मांडलेल्‍या उच्‍छादाला सरकारच जाणीवपुर्वक पाठीशी घालत आहे.

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- राज्‍यात कायदा व सुव्‍यवस्‍थेचा बोजबारा उडाला असून, जिथे सरकारच हरविले आहे, तिथे गृह विभागाचे अस्तित्‍व तरी काय दिसणार? (MLA Vikhe)

धाक दपटशाहीमध्‍ये सामान्‍य माणसाचा आवाज दाबण्‍याचे काम सुरु असुन, ग्रामीण भागात वाळु माफीयांनी मांडलेल्‍या उच्‍छादाला सरकारच जाणीवपुर्वक पाठीशी घालत असल्‍याचा थेट आरोप आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला.

विधानसभेच्‍या हिवाळी आधिवेशनात विरोधी पक्षाच्‍या वतीने मांडण्‍यात आलेल्‍या अंतीम आठवडा प्रस्‍तावावर बोलताना राज्‍यातील कायदा व सुव्यवस्‍थेवर परखड शब्‍दात टिका करुन, आ.विखे पाटील यांनी सरकारच्‍या निष्‍काळजीपणाचे दाखले सभागृहात मांडले.

मुख्‍यमंत्र्यांपासुन ते मंत्र्यांपर्यंत सर्वचजण चौकशीच्‍या फे-यात अडकले आहेत, जनतेच्‍या संरक्षणाची ज्‍यांच्‍यावर जबाबदारी आहे तेच कायद्याच्‍या कचाट्यात अडकल्‍याने जनतेला तरी कोन न्‍याय देणार असा सवाल त्‍यांनी उपस्थित केला. मागील दोन वर्षात राज्‍यातील गुन्‍हेंगारीमध्‍ये झालेली वाढ अतिशय चिंताजणक असुन, अॅट्रॉसिटीच्‍या तक्रांरीची वाढती टक्‍केवारीसुध्‍दा गंभिर आहे.

राज्‍यात महिला पुर्णपणे असुरक्षित झाल्‍या असुन, शक्‍ती कायदा आणायला सरकारला दोन वर्षे लागले. सगळेच मंत्री मुख्‍यमंत्री म्‍हणून वागत असल्‍याची टिका करुन, आ.विखे पाटील यांनी सांगितले की, विदेशी दारुवरील कर माफ करण्‍यासाठी मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत एकमताने निर्णय होतो, परंतु पिढीत महिलांना मदत करण्‍यासाठी महाविकास आघाडी सरकारमध्‍ये निर्णय होत नाही हे अत्‍यंत दुर्दैवी असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

महसुल आणि पोलिस प्रशासनाची असलेली मिलीजुली भगत वाळु माफीयांना पाठीशी घालत आहेत, नियम आणि कायदे मोडुन वाळु उपसण्‍याचे काम सुरु आहे. या वाळु माफीयांची हिंमत इतकी वाढली आहे की, आधिका-यांनाही हे आता जुमानायला तयार नाहीत.

वाळु माफीयांचा हा उच्‍छाद उघड्या डोळ्यांनी बघण्‍याचे काम फक्‍त सरकारकडुन सुरु असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. कोव्‍हीड संकटात राज्‍य सरकारने कोणतीही मदत समाज घटकांना केली नाही. केवळ केंद्राकडे बोट दाखविण्‍याचे काम सरकारकडुन होत राहीले.

लसिकरणासाठी मुख्‍यमंत्र्यांनी धनादेश लिहून ठेवला असल्‍याचे सांगितले होते, परंतु आता हा धनादेश कुठे गेला ? पंतप्रधानांनी मोफत लस उपलब्‍ध करुन दिली. राज्‍य सरकारचे सहा हजार कोटी रुपये वाचले आहे,

त्‍यातूनच पाच लाख रुपयांची मदत कोव्‍हीड मध्‍ये मृत झालेल्‍या व्‍यक्तिंच्‍या नातेवाईकांना देण्‍याची मागणी करतानाच दिड ते दोन वर्षे मंदिर बंद ठेवण्‍यात आल्‍याने तिर्थक्षेत्रांच्‍या ठिकाणची व्‍यवसायीक घडी पुर्णपणे विस्‍कटली आहे. या सर्व व्यवसायीकांना करांमध्‍ये सवलत देवून मदत करावी अशी सुचनाही त्‍यांनी आपल्‍या भाषणात केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe