अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एसटी कर्मचाऱ्याची पत्नी पुष्पा yelwande यांनी adv सुविध कुलकर्णी व adv. प्रतिक्षा काळे यांच्या मार्फत एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या संदर्भात याचिका दाखल केली आहे.
आज या याचिकेवर पहिली सुनावणी पार पडली. यावेळी मा. न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर एन लड्डा यांच्या खंडपीठाने याचिकेची दखल घेत राज्य परिवहन महामंडळा सह संबंधित विभागाच्या प्रतिनिधींना नोटिसा बजावण्याचा आदेश पारित केला आहे.
दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने adv. देशमुख हे हजर झाले आहेत. त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने याचिकेवर म्हणणे सादर करण्यासाठी वेळ मागितला.
पुढील सुनावणी आठवड्यानंतर ठेवण्यात आली आहे. राज्य परिवहन मंडळाकडून मिळणारे अनियमित तुटपुंजे वेतन व पुरेश्या सोई सुविधा चा अभाव यामुळे हवालदिल झालेले कर्मचारी आत्महत्येचा पर्याय निवडत आहेत.
महाराष्ट्रातील जवळपास 29 एसटी कर्मचाऱ्यांनी परिस्थिती ला कंटाळून आत्महत्या केली आहे. मात्र अद्यापही एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्यांचा विचार राज्य सरकारसह राज्य परिवहन मंडळ करत नसल्याने अखेर एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने न्यायालयात धाव घेतली.
दर चार वर्षाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यां संदर्भात करण्यात येणार समझोता करार करून एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढा अथवा एसटी चे शासनात विलिनीकरण करा याबाबत संबंधित विभागाला न्यायालयाने आदेश द्यावेत या दोन प्रमुख मागण्या सह अन्य मागण्या या याचिकेच्या माध्यमातुन करण्यात आल्या आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम