अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने काही दिवसांपूर्वी अनलॉकची घोषणा करण्यात आली होती. यामुळे सर्व उद्योग , व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु झाले होते. यामुळे बाजरात सकारात्मकता दिसून आली होती.
मात्र आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनने काहीसे निर्बंध लागू केले आहे. याचाच परिणाम आता दिसू लागला आहे. यातच 4 वाजेपर्यंत व्यवसाय सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने व्यापाऱ्यांसह, व्यवसायीकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
डेल्टा प्लसमुळे जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते ४ या वेळेत हॉटेल सुरू असून, शनिवार व रविवारी केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे.
पार्सलसेवा हॉटेल चालकांनी सुरू ठेवली आहे; परंतु ही सेवा देणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बहुतांश हॉटेल चालकांनी पार्सल देणेही बंद केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत.
त्याचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. गेल्या वर्षभरापासून बंद असलेले हॉटेल तिसऱ्या लाटेनंतर सुरू करण्यात आले होते; परंतु डेल्टा प्लसमुळे पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेसह सकाळी ७ ते ४ तर शनिवारी व रविवारी हॉटेल सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. आठवड्यातील दोन दिवस केवळ पार्सल व घरपोच सेवा देण्यास हॉटेल चालकांना मुभा देण्यात आली आहे.
शनिवार व रविवारी हॉटेलमध्ये चांगली गर्दी असते; परंतु हे दोन दिवस हॉटेल बंद ठेवाव्या लागतात.
पार्सल सेवा सुरू ठेवणे हॉटेल चालकांना अर्थिकदृष्ट्या परवडत नाही. बहुतांश हॉटेल चालकांनी हॉटेल बंद ठेवले असून, हॉटेल चालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम