अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- मजुरी करणाऱ्या इसमाने बायकोने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून कालव्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हि धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरातील खिलारी वस्ती येथे घडली आहे.
या घटनेत सागर रामदास कांबळे (वय 30) याचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि , तीन दिवसापूर्वी संध्याकाळी पाचच्या दरम्यान दारू पिण्यासाठी बायकोने पैसे दिले नाही म्हणून नवरा बायकोमध्ये भांडण झाले होते.
त्यानंतर सदर इसमाने घराजवळील कालव्यात उडी मारली. त्याचा मृतदेह आज सकाळी दहा वाजता अशोक नगर कारखान्यात समोरील पुलाजवळ पाठाच्या कालव्यात आढळून आला आहे.
कांबळेने कालव्यात उडी घेतल्यानंतर त्याच्या पत्नीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली होती.
त्यानंतर तीन दिवस सलग पोलीस सदर इसमाचा शोध घेत होते. अखेर आज कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. सदर इसमाच्या पश्चात पत्नी ज्योती व एक मुलगा असा परिवार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम