अहमदनगर ब्रेकिंग : धडक एवढी जोरात की इंजिनसह प्रवासीही बाहेर फेकले, दोघे ठार ! पहा कोठे झाला अपघात

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News:भरधाव वेगाने जाणारी मालट्रक आणि कार यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला.

कारचे इंजिन निखळले गेले आणि आत बसलेल्या तीन तरुणांसह बाहेर फेकले गेले. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला आहे. नगर-सोलापूर रोडवर सोमवारी दुपारी मांदळी गावाजवळ हा भीषण अपघात झाला.

या अपघातात शरद शोभाचंद पिसाळ (वय ३२), निळकंठ रावसाहेब माने (वय ३४) व धर्मराज लिंबाजी सकट (वय २७ तिघे रा. थेरगाव, ता. कर्जत) यांचा मृत्यू झाला.

महामार्गाच्या चौपदरीकरणसाठी मांदळी शिवारामध्ये पुलाचे काम सुरू आहे. तेथे हा अपघात झाला. हे तरुण मिरजगावकडून मांदळीकडे कारमधून (एमएच ०४ डीएन ३३४१) निघाले होते.

त्यावेळी समोरून येणारा मालट्रक (टीएन २८ एएम ३३४२) ने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. ट्रकची ठोकर बसल्यानंतर कार बाजूला जाऊन पुन्हा दुभाजकावर आदळली.

ही ध़डक एवढी जोरदार होती की कारचे इंजिनही निखले. खिळखिळ्या झालेल्या कारमध्ये बसलेले तरुणही बाहेर फेकले गेले. यामध्ये माने आणि पिसाळ दोघे जागीच ठार झाले. तर सकट याला रुग्णालयात नेले जात असताना मृत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe