अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. याची माहिती खुद्द आयशा मुखर्जीनं एक भावूक पोस्ट लिहीत दिली आहे.
२०१२ मध्ये शिखर धवन आणि आयशा यांचा विवाह झाला होता. २०१४ मध्ये दोघांना पुत्ररत्नही झालं होतं. परंतु विवाहाच्या तब्बल ९ वर्षांनंतर त्यांच्या या निर्णयानं सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
आयेशा शिखर पेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्यावेळी शिखरवर खूप टीका झाली होती. आयेशाचा या आधी देखील एक घटस्फोट झाला होता. पण तरीही शिखरच्या आईने त्यांच्या नात्याला स्विकारले.
2014 मध्ये शिखर आणि आयेशाला मुलगा देखील झाला. पण मागिल काही वर्षापासून या दोघांमध्ये काही कारणाने वाद होते. यालाच कंटाळून दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असावा असे बोलले जात आहे.
आयशा मुखर्जीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करताना एक भावनिक पोस्ट लिहिली – जेव्हा मी पहिल्यांदा घटस्फोट घेतला तेव्हा घटस्फोट हा एक घाणेरड्या शब्दासारखा होता. असे वाटले की मी सर्वांना निराश केले.
मी माझ्या पालकांना निराश केले. मला वाटले की मी माझ्या मुलांना, अगदी देवालाही निराश करत आहे. कल्पना करा की मला दुसऱ्यांदा यातून जावे लागेल. मी सर्वांना निराश केलं असं मला वाटलं,
स्वार्थी वाटलं आणि माझ्या पालकांना निराश केलं. माझ्या मुलांचा मी अपमान करत आहे अशी भावना मनात आली आणि काही प्रमाणात मला मी देवाचाही अपमान केला असल्याचंही वाटलं.
घटस्फोट हा अतिशय वाईट शब्द होता,” असंही तिनं आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहीलं आहे. दरम्यान शिखर धवननं सध्या याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. अथवा त्याच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.
यापूर्वी शिखर धवन आणि आयशा यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याचं वृत्त समोर आलं होतं. इतकंच नाही, तर आयशानं शिखर धवनचे सर्व फोटो आपल्या फीडमधून डिलीट केले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम