अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे. यातच भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या अनेकदा मानवी वस्तीकडे देखील येत असतो. दरम्यान नुकतेच संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द शिवारात एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे.
यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी की, ओझर खुर्द शिवारातील नेमबाई माळ परिसरात डाळीबं पिकाला औषध फवारणी करण्यासाठी चाललेल्या मंजूराना येथील शेतात एक बिबट्या निपचित पडलेला दिसला.

परंतू बराच वेळ होऊनही हालचाल होत नसल्याने धाडस करत थोडे जवळ पाहिले असता बिबट्या मृत असल्याचे लक्षात आले. एका शेतकऱ्याने याबाबतची माहिती वनविभागाला दिली.
माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत बिबट्याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान हा मृत बिबट्या हा अंदाजे दीड ते दोन वर्ष वयाचा मादी बिबट्या असून दोन बिबट्याच्या भांडणात या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर या मृत बिबट्यावर निबांळे येथील नर्सरीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम