कोरोना बाधितांची यादी सुद्धा चुकतीय ! चाचणी न करताही यादीमध्ये पत्रकाराचा समावेश…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास प्रशासनाला यश मिळाले असल्याचे एकीकडे दाखवले जाते. त्याच बरोबर दुसरीकडे रुग्ण वाढत असल्याचा भास निर्माण केला जातो, आताही बाब उघड झाली.

शनिवारी १२ जूनच्या यादीत आरटीपीसीआर झालेल्या रुग्णांच्या यादीत शहरातील एका पत्रकाराच्या नावाचा समावेश आहे. वास्तविक पत्रकार व त्यांच्या बरोबर असणारे ११ डिसेंबरच्या २०२० रोजी अॅडमिट होते. त्याच तारखेची यादी १२ जुनला पुन्हा प्रसिद्ध करण्यात आली असल्याने खळबळ उडाली.

पत्रकार पुन्हा पॉझिटिव्ह झाल्याची वार्ता पसरताच त्यांना अनेकांचे भ्रमणध्वनी आले. यादीत पत्रकारांसह सर्व कोरोना बाधित असल्याचे यादी प्रसिद्ध करून जाहीर करण्यात आले प्रत्यक्षात पत्रकाराची चाचणी घेण्यात आली नाही.

तरीही त्याचेसह अनेक लोकांचा समावेश बाधित रुग्णांच्या यादीत करण्यात पुन्हा आज आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रत्यक्षात चौकशी करता ही यादी १२डिसेंबर २०२०ची असून त्यावर १२जुनची मोहर लावण्यात आल्याचे दिसते.

या संदर्भात संबंधितांनी आमदार आशुतोष काळे, तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या कानावर ही बाब घालून निदर्शनास आणून दिली. यावरून आरोग्य विभागाची बनवाबनवी, बसल्याजागी पाट्या टाकने खोटी माहिती प्रसारित करणे व जनतेची दिशाभूल केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत संबंधित डॉक्टरने बातमी देऊ नका अशी विनंतीही त्या पत्रकाराला केली. असे जर होत असेल, तर आजपर्यंत दिलेली पंधरा महिन्यांची आकडेवारी खरी आहे का, याबाबत संभ्रम निर्माण झाला. आमदार आशुतोष काळे, तहसीलदार योगेश चंद्रे यांना ही बाब कानावर घातली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe