अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने ओला कंपनीने आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक स्कूटर OLA S1 लॉंच केली आहे. अत्यंत आकर्षक असणाऱ्या या स्कूटर ची किंमत 99,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
या स्कूटर ला कंपनीने S1 आणि S1 Pro दोन व्हेरीएंट मध्ये सादर केले आहे. त्यामुळे येत्या काळात हि स्कूटर भारतात Bajaj Chetak आणि Tvs iQube या इलेक्ट्रिक स्कूटरला जोरदार टक्कर देणार आहे.

वाढत्या इंधन दर आणि प्रदूषणाला उपाय म्हणून सध्या इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ तेजीत आहेत. याच वाहन प्रकारात ओला कंपनीने दमदार एन्ट्री केली आहे.
ओला कंपनीने OLA S1 स्कूटर च्या प्रीबुकिंग मोहिमेत जवळपास एक लाख नोंदणीचा टप्पा अगोदरच पार केला आहे. त्यामुळे ओला ची बहुचर्चित असलेली ई-स्कूटर आज अधिकृतपणे भारतीय बाजारात लॉंच करण्यात आली आहे.
Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरला ताशी 115 किमी क्लास-लीडिंग टॉप स्पीड मिळते. तसेच एका चार्जिंग मध्ये तब्बल 181 किमी अंतर पार करण्याची क्षमता या स्कूटर मध्ये असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
ओला कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी काही आठवड्यापूर्वीच नोंदणी सुरु केली होती. यामध्ये केवळ 499 रुपये टोकन रक्कम ठेवण्यात आली होती. फक्त 24 तासांत एक लाख पेक्षा अधिक लोकांनी या स्कूटरसाठी प्री बुकिंग केले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम