अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- शहरासह जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूतांड्व सुरु आहे. दरदिवशी हजारोंच्या संख्येने बाधितांची भर जिल्ह्यात पडत आहे.
एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे तर दुसरीकडे मरण पावणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
वाढत्या मृत्यूमुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये शहरातील नालेगाव परिसरातील अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी सकाळपासून नंबर लागत आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोरोना बळींची संख्या वाढली असल्याने अमरधामध्ये मृतासोबत त्याच्या नातेवाईकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
यामुळे नगर शहरातील सर्वात मोठे असलेले अमरधाम चे मुख्य गेट जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने बंद करण्यात आले आहे.
कारण कोवीड रुग्णांचा अंत्यविधी वेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन आणि रुग्णांचे नातेवाईक सर्व विधी करत होते. संबंधित ठेकेदाराचे लोक ऐकत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|