ऊर्जा राज्यमंत्री म्हणाले, कधी ना कधी कोळसा संपणारच आहे, तेव्हा…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Ahmednagar News :- आज कोळसा टंचाईमुळे वीज भारनियमन करण्याची वेळ आली आहे. मात्र, आगामी पंधरा-वीस वर्षांत देशातील कोळशाचा साठा संपणारच आहे.

त्यावेळी सौरऊर्जेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे पंप बसवून घ्यावेत, असा सल्ला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.

राहुरी तालुक्यात खंडांबे येथील वीज उपकेंद्राच्या उभारणीच्या कामाचा प्रारंभ तनपुरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘केंद्र सरकारला वीज कंपन्यांचे खासगीकरण करायचे आहे. त्यामुळे या कंपन्यांची अडवणूक करण्यात येत आहे.

त्यामुळेच वीज भारनियमाची वेळ आली आहे. सध्या कोळश्याची टंचाई असल्याने भारनियमन करावे लागत आहे. मात्र, आगामी पंधरा-वीस वर्षांत देशात कोळशाचा साठा संपणार आहे.

त्यावेळी सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. सध्या सौर ऊर्जेसाठी अनुदान योजना आहे. त्याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारे कृषीपंप बसवून घ्यावेत,’ असेही तनपुरे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe