अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022  :- शहरातील नालेगाव परिसरातून एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या मामाने फिर्याद दिली आहे.

15 वर्षे वय असलेली मुलगी शुक्रवारी रात्री फिर्यादीच्या मुलासोबत एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेली होती. मुलगा परत घरी आला परंतू मुलगी आली नाही.

तीला कोणीतरी फुस लावून पळवून नेले असावे, अशी फिर्याद तिच्या मामाने रविवारी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी हरवल्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe