मनसेच्या त्या निवदेनची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली ताबडतोब दखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या काळात खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची सुरु असलेली लुटमार बाबत मनसेने नुकतंच जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन दिले होते, व या प्रकरणी आपण लक्ष द्यावे अशी मागणी केली होती.

मनसेच्या या निवेदनाची अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तात्काळ दखल घेतली आहे.या निवेदनावर जिल्ह्याधिकारी राजेंद्र भोसले यांनी तातडीने आपली प्रतिक्रिया दिली.

जिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्त यांच्या समिती द्वारे बिलाची चौकशी करणार आणि ताबडतोप समिती स्थापन करणार

तसेच खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या उपस्थितीत बैठक बोलावली जाईल रुग्णाला ऍडमिट करतांना डीपॉझिट रक्कम घेतली जाणार नाहीअसे आदेश देणार तसेच शासन नियमाप्रमाणे बिले बेडचे दर आकारले नाहीतर खाजगी हॉस्पिटल वर कारवाई करणार

असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. मनसेच्या मागणी मुळे खाजगी हॉस्पिटल मध्ये कोरोना आजारांवर उपचार घेणाऱ्या रूग्णांची सर्वसामान्य नागरिकांची लूटमार होणार नाही. त्यामुळे शहरामधील सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केला जात आहे .

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe