Maharashtra news : सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतरही राज्यातील राजकीय घडामोडी थांबण्याऐवजी अधिक वेगाने सुरू झाल्या आहेत. ठाकरे सरकार पाडून भाजपचे सरकार आणण्यासाठी भाजपचे वेगवेगळे प्लॅन तयार असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यातील एका प्लॅननुसार अविश्वास ठरावाला सामोरे जाण्यासाठी भाजपकडून विधानसभेत हंगामी अध्यक्षाच्या नियुक्तीची खेळी खेळली जाऊ शकते. यासाठी पूर्वी असे काम केलेले भाजपचे ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची नावे चर्चेत आहेत.सभापतीपद सध्या रिक्त आहे.

उपसभापती नरहरी झिरवळ सध्या ही जबाबदारी सांभळत आहे. मात्र, अविश्वास ठरावासारख्या महत्वाच्या कामाकाजाला सामोरे जाताना भाजपला हे परवडणार नसल्याने राज्यपालांमार्फत रिक्त असलेल्या पदावर हंगामी अध्यक्ष नियुक्त करून कामकाज चालविले जाण्याची खेळी खेळली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. मात्र, नियमानुसार हे शक्य होईल का? याला पुन्हा कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते का? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.