अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- देशात करोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ओमायक्रॉनचा(Omicron) देखील बहुतांश राज्यांमध्ये प्रसार झाला आहे . कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असताना भाजपकडून उत्तरप्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवणारे कार्यक्रम आयोजित जात आहेत(Up Election)
या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर निर्बंधांची चर्चा सुरू झाली आहे. जमलेल्या गर्दीवरून नवाब मालिकांनी कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याला भाजप जबादार असेल असे त्यांनी वक्तव्य करून भाजप वर निशाणा साधला आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. देशात आतापर्यंत १५०० पेक्ष्या ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले आहेत.
करोनामुळे एकीकडे चिंता वाढली असताना दुसरीकडे उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार रंगात आला आहे. या प्रचारसभांना मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. या मुद्द्यावरून नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
“उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी पक्षाकडून प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवली जात आहे. त्यांच्या प्रचारसभा थांबत नाहीत. इतर राज्यांत निवडणुका असताना दुसरी लाट आली, येणाऱ्या तिसऱ्या लाटेत भाजपचा हात असे असे नवाबांनी स्पष्ट केले
नवाबांनी दिला निवडणुका बाबत तो सल्ला
निवडणूका पुढे ढकलून राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव खेळू नका. निवडणूक घेत असताना पाच लोकांपेक्षा जास्त प्रचाराला हजर राहणार नाही, डोअर टू डोअर प्रचार करणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे अशा निवडणुका होऊ शकतात. निवडणुकीबाबतचा असा सल्ला त्यांनी भाजपाला दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम