PAN Card : देशातील अनेक व्यक्तींकडे पॅन कार्ड आहे. अनेक कामांसाठी पॅन कार्डची गरज पडत आहे. सध्या बँकेत 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी पॅन कार्डची खूप गरज असते. परंतु, आता अवैध पॅनद्वारे तुमचे काम होणार नाही.
तुम्ही आता 1000 रुपये देऊन आधारशी पॅनकार्ड लिंक करू शकता. अनेकांना असा प्रश्न पडतो की आपण वापरत असणाऱ्या पॅन कार्डची वैधता किती दिवसांची असते. वैधता संपल्यानंतर पॅनकार्डचे काय होते? यांसारखे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर ही बातमी शेवटपर्यंत नीट वाचा.

याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे की पॅन कार्डची वैधता किती दिवस राहते? जरी तुम्हाला याबद्दल माहिती नसेल. तर हे लक्षात घ्या की पॅन कार्डची वैधता व्यक्तीच्या आयुष्यापर्यंत असते.
म्हणजेच जोपर्यंत ती व्यक्ती जिवंत आहे, तोपर्यंत त्याचे पॅन कार्ड वैध राहते. परंतु,जेव्हा ती व्यक्ती मरते तेव्हा त्या व्यक्तीचे पॅन कार्ड निष्क्रिय होते.
हे लक्षात ठेवा की पॅन कार्ड NSDL द्वारे जारी करण्यात येतात. जर तुमच्या पॅन कार्डमध्ये काही चूक असेल तर ती चूक तुम्ही सहजपणे ऑनलाइन अद्यतनित करू शकता.
10-अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक पॅन कार्डमध्ये प्रविष्ट करण्यात येतो. त्यामध्ये व्यक्तीची अनेक महत्त्वाची माहिती नोंदवण्यात येते . परंतु,जर तुम्ही तुमच्यासोबत एकापेक्षा जास्त पॅनकार्ड ठेवत असाल तर तुम्हाला खूप मोठा दंड भरावा लागू शकतो.