“दोन मंत्र्यांच्या वादाचे परिणाम राज्यातील जनता भोगते आहे”

Ahmednagarlive24 office
Published:

नागपूर : महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या लोडशेडिंग (Load shedding) चालू असल्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच इतर नागरिकांना ही लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागत आहे. माजी ऊर्जामंत्री (Former Minister for Energy) आणि भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले, दोन मंत्र्यांच्या वादाचे परिणाम राज्यातील जनता भोगते आहे. निधी अभावी नियोजन गडबडते हे माहिती असताना देखील महसूल मंत्रालयाकडून ऊर्जा विभागाचा 18 हजार कोटींचा निधी थांबविण्यात आला.

राज्यात वीज (Electricity) संकट निर्माण होऊ नये यासाठी कोळसाची साठवणूक करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून (Central Goverment) देण्यात येत होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बावनकुळेंनी केला आहे.

राज्यात तीन हजार मेगावॅटचे लोडशेडींग सुरू आहे. वीज बचतीचा संदेश देणे चुकीचे असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. उलट वीज वापरल्याने राज्य पुढे जाते, ऊर्जाच्या चुकीच्या नियोजनामुळे हे राज्य अधोगतीला जाते आहे.

एकीकडे राज्यातील गरीब शेतकऱ्यांची 500 रुपयांसाठी वीज कापली जाते. दुसरीकडे मात्र 18 हजार कोटींचा महसूल अडवला जातो. हे धोरण चुकीचे असल्याचे मत बावनकुळेंनी व्यक्त केले आहे.

पुभे बोलताना बावनकुळे म्हणाले, केंद्र सरकार सहकार्य करीत नाही असे जर ऊर्जा मंत्री म्हणत असतील तर ते खोटं बोलतात. उलट महाविकास आघाडीला आज केंद्र सरकारची जितकी मदत होते आहे, तितकी फडणवीस सरकारलाही होत नव्हती.

नुकतीच एनटीपीसीने राज्याला अल्पदरात 750 मेगावॅट वीज दिली आहे. रेल्वेकडे साठवलेला कोळसा ते राज्याला देण्यास इच्छुक आहेत.

परंतु निधीच नसल्याने मार्ग निघत नाही. आज राज्य अंधारात गेले तर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीनही पक्षांची जबाबदारी असतील असेही ते म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe