अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे, आजची कोरोनाबाधितांची भर पडतच असल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मात्र अद्यापही काही जणांकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र या महाभागांना कर्जत पोलिसांनी अनोखी शिक्षा दिली आहे.
कर्जत शहरामध्ये रस्त्यावरील गर्दी होत असल्याने, कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता कर्जत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्वतः व पोलीस कर्मचारी मिळून कर्जत शहारामध्ये विनामास्क फिरणारे व सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
काही लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, परंतु काही नागरिक कारवाईबाबत नाराजी व्यक्त करतात, काहींना कारवाईचा राग येतो, किती रुपये पावती आहे
सांगा असे म्हणून पैसे मोजू लागतात अशा नागरिकांना कर्जत पोलिसांनी स्वतः जवळचे मास्क तोंडास लावण्यास दिले. यानंतर त्या महाशयांना 2 तास पोलिसांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उभे केले.
यानंतर त्या महाशयांना दोन तासात काय अनुभव आला, तेही सांगावेत, असे ठणकावून सांगितले. दरम्यान काही वेळ पोलिसांसोबत काम केल्यानंतर नागरिकांना पोलिसांच्या कामाबाबत योग्य ती जाणीव झाली आणि यापुढे अशा प्रकारे पोलीस कारवाईला चुकीच्या पद्धतीने मत व्यक्त होणार नसल्याचे अशा भावना व्यक्त केल्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम