नियमांचे उल्लंघन करणाऱ्या त्या तरुणांकडून पोलिसालाच मारहाण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- मास्क का घातले नाही असे विचारल्याचे राग आल्याने सोमनाथ कुदळे नामक व्यक्तीने पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कॉलर धरून शर्टचे बटन तोडून गळ्यातील आयकार्ड हिसकावून फेकून दिले.

हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर शहर घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर हे शुक्रवार रोजी सायंकाळच्या सुमारास अशोकनगर फाटा येथे सरकारी आदेशानुसार दुकाने बंद करत होते.

यावेळी तेथे असलेले सोमनाथ भाऊराव कुदळे व बाळासाहेब निवृत्ती घोडके यांना खेडकर यांनी मास्क का घातले नाही असे विचारले. याचा राग आल्याने सोमनाथ कुदळे याने हवालदार खेडकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच बाळासाहेब घोडके याने देखील शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस हवालदार खेडकर यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तात्काळ आरोपी कुदळे व घोडे यांना अटक केली आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe