अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात रिक्त असणार्या मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकारी पदाच्या जागा पदोन्नतीने भरण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
या महिन्यांच्या अखेरीस मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकारी ही पदे भरण्यात येणार आहेत. प्राथमिक शिक्षण विभागातील मुख्याध्यापकांची 185 पदे आणि विस्तार अधिकार्यांची 17 पदे रिक्त आहेत.
ही पदे शिक्षण विभागातील शिक्षक ते मुख्याध्यापक यांच्यातून सेवाज्येष्ठतेेतून भरण्यात येणार आहेत. मुख्याध्यापक पदासाठी पद्वीधर आणि प्राथमिक शिक्षकांमधून तर विस्तार अधिकारी पदावर पदोन्नतीने प्राथमिक शिक्षक,
पदवीधर, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांच्यातून भरण्यात येणार आहेत. सेवाज्येष्ठतेने पात्र असणार्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली असून त्यावर हरकती घेऊन संबंधित यादी सुधारणा करून ती अंतिम करण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम