अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तू 17 सप्टेंबर रोजी लिलावात निघाल्या. पण या लिलावात सगळ्यात जास्त बोली लागली आहे ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या नीरज चोप्राच्या भाल्यासाठी.
भारताचा सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या भाल्यासाठी सर्वाधिक अशी 1 कोटी 50 हजार रूपयांची बोली लागली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या कृष्णा नागरच्या बॅडमिंटन रॅकेटला ८०.१५ लाखांची बोली लागली आहे.
अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराची लाकडी प्रतिकृतीही मोदींना भेट म्हणून मिळाली होती. यासाठी अडीच लाख रूपयांची बोली आहे.
तर मोदींना मिळालेल्या राम,लक्ष्मण, सिता आणि हनुमानाची एकत्रित मूर्ती विकत घेण्यासाठी १.३५ लाखांची बोली लागली आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताचा सुवर्णपदक विजेता खेळाडू सुमित अंतील याने वापरलेल्या भाल्याची लिलावात मूळ बोली १ कोटी रुपयांची होती.
आता या रकमेत वाढ होऊन ती १ कोटी २० हजार रुपये झाली आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावात बोली लावण्याची मुदत गुरुवारी संध्याकाळी संपली. या लिलावाला १७ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली होती. या लिलावातून मिळणारा निधी नमामी गंगे प्रकल्पाला देण्यात येईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम