पावसाचा जोर ओसरला ; निळवंडे धरण 32 टक्के भरले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यात सर्वदूर तसेच धरण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस कोसळत असल्याने या सर्व धरणांमध्ये या हंगामातील नवीन पाण्याची विक्रमी आवक झाली आहे.

मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. यामुळे पाण्याची आवक काहीशी कमी झाली आहे. उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात 12 तासांत 247 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.

त्यामुळे धरणातील पाणीसाठा 7858 दलघफू झाला होता. निळवंडेतही आवक होत असून हेही धरण 32 टक्के भरले आहे. भंडारदरा परिसरात पाऊस होत असल्याने वाकीचा ओव्हरफ्लो 1022 क्युसेक व अन्य पाणी निळवंडेत जमा होत आहे.

त्यामुळे काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 2615 दलघफू (31.46) टक्के होता. काहीसा पाऊस असल्याने मुळा नदीतील पाणीपातळी टिकून आहे. धरणात पाण्याची आवक सुरू असून 13475 दलघफू पाणीसाठा झाला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe