अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. अमेरिकहून नगर शहरात आलेल्या दोन नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
या दोघांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रवाशांचा प्रशासनाने शोध घेऊन तपासणी सुरू केली आहे.

नगर जिल्ह्यात पंधरा जण आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले आहे. त्यात नगर शहरातील दोघांचा समावेश आहे. नगर शहरात दोन, कोपरगाव दोन, राहता आणि राहुरी प्रत्येकी तीन, श्रीरामपूर चार आणि संगमनेर एक असे पंधरा जण आले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम