Maharashtra News : राज्यात १ जानेवारी ते १७ ऑगस्ट या कालावधीमध्ये स्वाइन फ्लूच्या १,६६८ रुग्णांची नोंद झाली असून, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ४९ आहे.
पुणे येथे स्वाइन फ्लूच्या सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली असून, ही संख्या ४३५ इतकी आहे; तर मुंबईत ३०० जणांना स्वाइनचा संसर्ग झाला आहे.

नागपूरमध्ये १५५, नाशिकमध्ये १४८ जणांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झला आहे. अहमदनगरमध्येही ५ रुग्णांची नोंद झालेली आहे. राज्यामध्येही मागील वर्षी ही रुग्णसंख्या कमी होती.
यंदा त्यात वाढ झाल्याचे दिसून येते. कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना, आता स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते.
आठ महिन्यांतील रुग्ण
पुणे – ४३५
मुंबई – ३००
नागपूर – १५५
नाशिक – १४८
अहमदनगर : ५
एकूण – १,६६८ (१ जानेवारी ते १७ ऑगस्ट)
मृत्यू – ४९