तत्पर पोलीस आणि नागरिकांमुळे टळला पेट्रोल पंपावरील दरोडा

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- कर्जत पोलीस व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील पेट्रोल पंपावरील दरोडा टळल्याची घटना घडली.

आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी पहाटे 03.45 वाजता पेट्रोल पंप मालक जयवंत फाळके यांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना फोन करून कळविले की, नगर सोलापूर हायवे वर थेरगाव च्या पेट्रोल फाळके पेट्रोल पंपावर येथे चोरटे आले आहेत.

तात्काळ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेला कॉल केला आणि तात्काळ मदतीचे आवाहन केले आणि कठीण देव येथील चेक पोस्ट वर रात्र गस्त कामी असलेले पोलीस जवान किरण आवारे आणि पोलीस मित्र तसेच मिरजगाव पोलीस दुरक्षेत्र हद्दीत रात्र गस्त कामी असलेले

पोलीस जवान जितेंद्र सरोदे जवानांना फोन करून घटनास्थळ गाठण्यास सांगून स्वतः सहाय्यक फौजदार बाळासाहेब यादव, शकील बेग यांच्यासह त्या ठिकाणी रवाना झाले. सदर पेट्रोल पंपावर आरोपींनी सुरुवातीस सुट्टे पैसे दे असा बहाणा केला.

नंतर बाहेर असलेल्या कामगार विजय बचाटे, रा. थेरगाव, अक्षय सकट, रा. थेरगाव ना जबरदस्तीने ज्या ठिकाणी रोख रक्कम आहे त्या ठिकाणी न्हेउन आत झोपलेल्या मॅनेजर धनंजय जाधव, रा. गवंडी गल्ली कर्जत ला उठविण्यासाठी जबरदस्ती केली. दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान काही मिनिटात पोलीस आणि नागरिक घटना ठिकाणी पोहोचले. ते पाहून आरोपींनी पळ काढला, पाठलाग केला. कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान जितेंद्र सरोदे, किरण आवारे, बाळासाहेब यादव, शकील बेग आणि थेरगाव चे तत्पर नागरिक ईश्वर जोगदंड, राहुल पोदकुळे, मधुकर शिंदे, सिद्धेश्वर शिंदे,

सतीश शिंदे, चैतन्य शिंदे, ऋषी शिंदे, मिनींनाथ शिंदे, मधुकर शिंदे, रवींद्र थोरात, रवींद्र महानवर, गणेश सोनवणे, सतीश शिंदे, नाना शिंदे पेट्रोल पंपावर काही मिनिटातच पोहोचल्याने मोठा दरोडा टळला. पोलीस, नागरिक आणि पेट्रोल पंप मालक यांनी चांगले प्रसंगावधान आणि तत्परता दाखविली.

दरम्यान मॅनेजर धनंजय जाधव यांना घाबरू नका काही मिनिटातच त्या ठिकाणी पोलीस आणि नागरिक येत आहेत असा 3 वेळा फोन करून धीर दिला. पेट्रोल पंप मालक आणि चालक यांनी कर्जत पोलीस आणि ग्रामस्थांचे आभार मानले तर पोलीस निरीक्षक यांनी पेट्रोल पंप येथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे कौतुक केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe