विकायचं आणि मजा मारायची करायची ही भूमिका दिल्लीच्या सरकारची

Published on -

पुणे : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (2024 Lok Sabha Election) आतापासूनच विविध पक्षांनी मोट बांधायला सुरुवात केली आहे. काँग्रेस (Congress) पक्षाकडून ही जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी वेगळेच संकेत दिले आहेत.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था खाली गेली आहे. उद्योगधंदे खाली गेले आहेत. रोजगारांच्या संधी कमी झाल्या आहेत. महागाई वाढत आहे ही आणि केंद्र सरकार एक एक प्रकल्प बाजारात विकायला लागलं आहे.

उत्पादनाचं साधनच नाही. विकायचं आणि मजा मारायची करायची ही भूमिका दिल्लीच्या सरकारची आहे. म्हणून राज्यात तर आपलं सरकार पाहिजे आणि दिल्लीतही आपल सरकार पाहिजे. यासाठी शरद पवार (Sharad Pawar) हे देशात नवीन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे सूतोवाच वळसे पाटील यांनी केले आहेत.

राज्यातही आपलं सरकार असलं पाहिजे. केंद्रातही आपलंच सरकार पाहिजे. त्यासाठी पवारसाहेब देशातील सर्व पक्षातील नेत्यांना एकत्र करण्याच काम करत आहेत. नव्याने काही मांडण्याचा व करण्याचा प्रयत्न करत आहेत असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.

अभिनेत्री केतकी चितळे विषयीही वळसे पाटील यांनी भाष्य केले आहे. अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या पोस्टच्या निषेधार्थ काल ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती अंडी फेकली होती.

या घटनेची स्थानिक पोलीस चौकशी करून जे कुणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करतील असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याबाबत जे बोलतील त्यांना जशास तसे उत्तर देऊ असं म्हटलं होतं. त्यावर कार्यकर्त्यांनी असे करू नये. भावना असतात हे मान्य आहे. पण प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा असतात. त्याचे पालन केले पाहिजे, असेही पाटील म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe