देशभर हद्यरोगाचे प्रमाण वाढ असतांना…महागड्या शस्त्रक्रियेमुळे परिस्थिती अभावी अनेक रुग्णांना उपचार मिळत नाहीत….अशा रुग्णांसाठी आता प्रवरा मेडिकल ट्रस्टने नविन वर्षात नविन आशेचा किरण निर्माण केला आहे.
हृदयाच्या अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रियेचे गांभीर्य लक्षात घेता हृदय संदर्भात जटील शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी वैद्यकीय टीमची आवश्यकता असते. यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्ट प्रमुख डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी पुढाकार घेत हृदयविकारासंबंधी जागतिक तज्ज्ञ डॉ. राहुल चंडोला यांच्या सहकार्याने विशेष अवयव प्रत्यारोपण केंद्राची सुरवात केली. या केंद्रात गेली काही महीने शासकीय आणि विशेष निधीच्या साह्याने हदय् आणि इतर अवयवा संदर्भात उपचार केंद्र सुरु केले आहे.
मात्र जिल्ह्यातील एका रुग्ण रक्तवाहिनीला आलेल्या फुग्याच्या जटील आजाराने गेली ३ ते ४ वर्ष ग्रस्त होते. यावर शहरात उपचार घ्यायचे असेल तर 15 लाख रुपये खर्चाची आवश्यकता होती.मात्र आर्थिक परिस्थितीमुळे उपचार मिळत नव्हते. या रुग्णाच्या मागे प्रवरा मेडिकल ट्रस्टने खंबीरपणे उभे राहत ही दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान १२ तासाच्या अथक परिश्रमाने डॉ.चंडोला यांच्या सह डॉ प्रभात रंजन , डॉ धीरज जांभ, डॉ. एस . दिघे,डॉ.अक्षय शेट्टी ,डॉ सुमन रेड्डी, डॉ अमन धलोवल, डॉ अदीत्य वलग,यांच्यासह १५ जणांच्या टीमने हे आव्हान पेलले.
सदर रुग्णाला नव्या वर्षाच्या उगवत्या सुर्याच्या साक्षीने यशस्वी उपचार करुण घरी सोडण्यात येणार आहे.डॉक्टरांच्या या सांघिक प्रयत्नाचे डॉ राजेद्र विखे पाटील यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. तर राज्यातील इतर गरजु रुग्णांसाठी प्रवरा मेडीकल ट्रस्ट पुढील काळात भरिव कार्य करेल असा विश्वास यावेळी बोलतांना त्यांनी व्यक्त केला.
डॉक्टरांच्या या संघाचे प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ व्ही. एन. मगरे , विश्वस्त ध्रुव विखे पाटील , अधिष्ठाता डॉ राजवीर भलवार, निवृत्त मेजर जनरल सुशीलकुमार झा आदींनी अभिनंदन केले आहे.