उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली, म्हणून साडेसाती दूर करण्यासाठी आम्ही हनुमान चालिसाचं पठण केलं

Published on -

मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिल्लीत (Delhi) आज पत्रकार परिषद (press Conferance) घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली असे विधानही केले आहे.

रवी राणा म्हणाले, ‘इंग्रजांच्या काळातील राजद्रोहाचं कलम लावलं आहे. इंग्रजांनी हे कलम आणलं होतं. अनेक महापुरुषांवर हे कलम लावलं. तेच कलम आम्हाला लावलं. आपल्यावरील संकट आणि साडेसाती दूर करण्यासाठी आम्ही हनुमान चालिसाचं पठण (Hanuman Chalisa) केलं होतं.

उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून राज्याची दुर्दशा झाली आहे. म्हणून हनुमान चालिसा वाचला. पण कोर्टाने आज कायद्याला स्थगिती दिली. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि किरेन रिजीजू यांचे आभार.

इंग्रजांचे कायदे मोडून काढण्याचं काम मोदी करत आहे. ठाकरे सरकार इंग्रजांचे कायदे पाळतं हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे. आम्ही कोर्टाचा आदर करतो. सरकारचे आभार मानतो, असे वक्तव्य रवी राणा यांनी केले आहे.

त्याचसोबत खासदार नवनीत राणा यांच्या मुंबईती फ्लॅटविरोधात मुंबई महापालिकेने अनियमित बांधकाम प्रकरणी कारवाई सुरु केली आहे. मुंबई महापालिका ही शिवसेनेची भ्रष्टाचाराची लंकाच आहे, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

यावर बोलताना ते म्हणाले, ‘ २००७ मध्ये इमारत बांधली गेली. त्यानंतर ७ ते ८ वर्षाने फ्लॅट घेतला. अनिल परब आणि संजय राऊत यांचे दहा बारा फ्लॅट आहे. माझा एकच आहे. शेतकऱ्याच्या मुलाचा फ्लॅट आहे. आम्ही सर्व परवानग्या घेतल्या. महापालिकेने बिल्डरला सर्व परवानग्या दिल्या होत्या.

१५ वर्षानंतर आम्हाला नोटीस आली. केवळ उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून नोटीस आली. खालच्या स्तरावर जाऊन घराला नोटीस दिली. महिला खासदारांना आमदाराला त्रास द्यायचं काम करत असेल तर पालिका ही शिवसेनेची भ्रष्टाचाराची लंका आहे. महापालिकेत आम्ही युद्धपातळीवर उतरू, असा थेट इशारा रवी राणा यांनी यावेळी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe