फेब्रुवारीपासून शेअर बाजारात तब्बल 29 लाख कोटींचं झालं नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील घसरणीचा आलेख थांबता थांबेना. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली.

विशेष बाब म्हणजे फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे 29 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

युक्रेन संकटाशी संबंधित चिंतेमुळे जगभरातील बाजार कमजोर दिसत आहेत. शेअर बाजारातील बेन्चमार्क इंडेक्स सेन्सेक्स1491.06 अंकांनी किंवा 2.74 टक्क्यांनी घसरुन 52842.75 अंकांवर बंद झाला.

तर निफ्टी 382.20 अंकांनी किंवा 2.35 टक्क्यांनी घसरुन 15863.15 अंकांवर बंद झाला. BSE चे बाजार भांडवल 2 फेब्रुवारीपासून आतापर्यंत 270.6 लाख कोटी रुपयांवरून 241.2 लाख कोटी रुपयांवर आले आहे.

एका दिवसात गुंतवणूकदारांचे 5.44 लाख कोटींचं नुकसान सोमवारच्या घसरणीनंतर शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 241.35 लाख कोटी रुपयांवर आले. गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचे मार्केट कॅप 246.79 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. आजच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे 5.44 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

रशियाचा युक्रेनवरील हल्ला आता केवळ दोन्ही देशांपुरता नाही तर जागतिक विकासासाठी मोठा धोका बनत आहे.या युद्धाचे पडसाद आता उमटू लागले आहे.

कच्च्या तेलाच्या किमती 13 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या. हा भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांसाठी मोठा धक्का आहे.