अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या गड-कोट- किल्ल्यांचा इतिहास जीवंतपणे जाणता राजाच्या माध्यमातून निर्माण करण्यात बाबासाहेब पुरंदरे यांचा सिंहाचा वाटा आहे.
त्यांच्या निधनाने निष्ठावंत शिवशाहिरीचा सूर्य अस्ताला गेला, अशा शब्दांत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी श्रध्दांजली वाहिली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे नाशिक येथे तत्कालीन खासदार स्व. वसंतराव पवार यांच्या निवासस्थानी आले असता माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्याशी इतिहासकाळातील मनमोकळ्या गप्पा करत त्याबाबतची माहिती घेतली.
इतिहासकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीची दुरुस्ती करण्यासाठी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी केंद्र व राज्य सरकारबरोबरच पुरातत्व खात्याशी मोठा पाठपुरावा केला होता.
शिवकालीन इतिहास काय आहे, त्याकाळातील युध्दनिती, शस्त्र, गड कोट किल्ल्याबरोबरच सुरक्षा व्यवस्थापन, शिवशाहीतील स्मरणात राहणार्या व्यक्तीरेखा आणि त्यांची पात्रे आदींचा मूर्तीमंत, अभ्यासू नेतृत्वाचा अस्त झाला असेही ते म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम