SBI : नोकरीचे संपले टेन्शन! SBI देतेय तुम्हाला महिन्याला हजारो कमावण्याची संधी

SBI : देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहक वर्ग खूप आहे. बँक आपल्या ग्राहकांना नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असते. 

अशातच आता ही बँक प्रत्येक महिन्याला 60,000 रुपये कमावण्याची एक चांगली संधी देत आहे. त्यासाठी तुम्हाला या बँकेची ATM फ्रँचायझी घ्यावी लागेल.

तुम्ही जास्त पैसे कमावण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. देशभरात अशा खूप पैसे देणाऱ्या अनेक नोकऱ्या आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असणारी एसबीआय आता आपले एटीएम वाढवण्यावर भर देत असून तुम्ही आता ज्याची फ्रँचायझी आरामात घेऊ शकता. जर तुम्हाला ही फ्रँचायझी मिळाली तर तुम्ही महिन्याला 60,000 रुपये आरामात कमावू शकता.

होईल मोठी कमाई

जर तुमच्याकडे कोणतीही नोकरी नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही आता या बँकेची ATM फ्रँचायझी घेतली तर दर महिन्याला चांगली कमाई करू शकता.

तसेच फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला जास्त धावपळ करण्याची गरज भासणार नाही. तुमच्याकडे सर्वप्रथम रस्त्याच्या कडेला 50-80 चौरस फूट मोकळी जागा असावी. तसेचे तेथे सर्व व्यवस्था असाव्यात. दुसऱ्या एटीएमचे अंतर किमान १०० मीटर असावे.

1 किलोवॅट वीज जोडणी तसेच 24 तास वीजपुरवठा असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला आरामात फ्रँचायझी मिळेल. एटीएम बसवल्यानंतर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून जास्त पैसे कमवू शकता.

वार्षिक उत्पन्न असेल इतके 

जर तुम्हाला या बँकेच्या एटीएमची फ्रँचायझी मिळाली तर तुम्ही चांगली कमाई करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत. तुम्ही प्रत्येक महिन्याला 60,000 रुपये तर वर्षाला सुमारे 7 लाख 20 हजार रुपये कमवू शकता.