अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- पाथर्डी कृषि उत्पन्न बाजार समितीची शहरातील सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या जुन्या शाखेच्या रिकाम्या जागेच्या तक्रारीबाबत जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर हे मंगळवारी (दि.25) याबाबत निर्णय देणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान याबाबत तक्रारदार गोरक्ष पांडुरंग ढाकणे व बाजार समितीचे सभापती व सचिव यांची 28 डिसेंबर 2021 रोजी आहेर यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुनवणी घेतली.
यात बाजार समितीच्या वतीने लेखी स्वरूपात म्हणणे मांडले. त्यावर तक्रारदार गोरक्ष ढाकणे हे 25 जानेवारी 2022 राजी आपले म्हणणे मांडणार असुन त्यानंतर सुनावणी पुर्ण होऊन जिल्हा निबंधक दिग्विजय आहेर हे अंतिम निकाल देणार आहेत.
41 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक अनामत रक्कम मिळणार असताना. बाजार समिती संचालक मंडळाने मासिक सभेत ऐनवेळच्या विषयात ठराव करून सदर जागा फक्त तीन लाख रुपये अनामत घेऊन भाडेतत्त्वावर दिली आहे.
जागा भाडेतत्त्वावर देताना पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या नियम व अटीचे पालन न करता भंग केलेला असल्याची गोरक्ष ढाकणे यांची तक्रार आहे.
दरम्यन याप्रकरणाचा अंतिम अहवाल जिल्हा उपनिबंधकांना सादर केला आहे. जिल्हा उपनिबंधक काय निकाल देतात याकडे पाथर्डी तालुक्यातील राजकीय व्यक्तीसह जनतेचे लक्ष लागले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम