अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- दक्षिण आफ्रिकेत करोना विषाणूचा नवा प्रकार B.1.1.529 समोर आला आहे आणि हा विषाणू लसीकरण झालेल्या व्यक्तिमध्ये तयार झालेली रोगप्रतिकारक शक्तीलाही भेदू शकतो अशी माहिती असल्यानं जगभरात चिंतेचे वातावरण पसरलं आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
यूरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुळं निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात भारतानं कोणती काळजी घ्यावी आणि उपाययोजना करावी,
यासंदर्भात तातडीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर काही देशांमध्ये करोनाच्या नव्या विषाणूने बाधित रुग्ण आढळले आहेत. तर भारतात करोना बाधित लोकांचा दैनंदिन आकडा हा खाली आलेला आहे,
सर्व व्यवहार, सुरळित सुरु झालेले आहेत, लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे, आंतरराष्ट्रीय विमान सेवाही पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मात्र आता या व्हेरियंटमुळे पुन्हा चिंता वाढली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम