Maharashtra Politics: शिवसेनेला नवी उभारी देण्यासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरू आहे.
या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा ९ आणि १० ऑगस्ट रोजी जळगाव, मालेगाव, नाशिक आणि भिवंडी ग्रामीणमध्ये आयोजित करण्यात आला होता.

मात्र, आदित्य आजारी पडल्याने त्यांचा प्रस्तावित नाशिक आणि जळगाव दौरा रद्द करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यभरातील संघटन मजबूत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बैठका आणि मेळाव्यांचा धडाका लावला आहे.
त्याचाच भाग म्हणून आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात आदित्य ठाकरे जळगाव आणि नाशिकच्या दौऱ्यावर जाणार होते.
मात्र, आदित्य ठाकरे यांचा जळगाव आणि नाशिकचा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे आजारी असल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आला.
दौरा तात्पुरता रद्द करण्यात आल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी जळगाव, मालेगाव, नाशिक आणि भिवंडीकरांची दिलगिरी व्यक्त केली.