तिघांनी ऑटो गॅरेजमध्ये चोरी केली आणि पोलिसांनी लगेच पकडले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  ऑटो गॅरेजमध्ये चोरी करणार्‍या तिघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. मतिन गफ्फार शेख (वय 31 रा. कोठी), इरफान अन्वर शेख (वय 25 रा. शाहूनगर, केडगाव) आणि समीर बाबासाब शेख (वय 38 रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.(Ahmednagar Crime)

सोमनाथ सुभाष रानमळ (वय 35 रा. नागरदेवळे ता. नगर) यांचे अहमदनगर महाविद्यालयाशेजारी सुभाष ऑटो केअर नावाचे दुकान आहे.

चोरट्यांनी रानमळ यांच्या दुकानात 31 डिसेंबर 2021 रोजी रात्री साडेआठ ते 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजण्यापूर्वी चोरी केली.

या दुकानातील लोखंडी लोडर, 14 इंची नांगर असा 27 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज चोरला होता. याप्रकरणी रानमळ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरच्या गुन्ह्यातील आरोपीविषयी पोलिसांनी माहिती काढली. पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकर शाखेच्या (डिबी) पथकाने आरोपींना अटक केली. पोलीस नाईक गणेश धोत्रे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News