गाडी आडवी लावून डंपर चालकाला लुटले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- डंपरला दोन चारचाकी वाहने आडवी लावून डंपर चालकाला शिवीगाळ, दमदाटी करत त्याच्या खिशातून २० हजार रूपयाची रक्‍कम काढून घेतली. निंबळक (ता. नगर) बायपास शिवारात ही घटना घडली.

याप्रकरणी बापू सोनवणे (रा. हिंगणगाव ता. नगर) व इतर अनोळखी ७ ते८ इसमांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपर चालक नरोत्तर गुठारी सिंग (वय ५० रा. मध्यप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नरोत्तर सिंग हे त्यांच्या ताब्यातील हायवा डंपर निंबळक बायपास रोडने सांगलीकडे घेऊन चालले होते.

रात्री साडेदहाच्या सुमारास लामखेडे पेट्रोलपंपाजवळ आरोपींनी फॉच्युनर (एमएच १९२ पीसी ९९९ ) व विना नंबरची स्कॉर्पिओ नरोत्तर सिंग यांच्या ताब्यातील डंपरला आडवी लावली. आरोपींनी नरोत्तर सिंग यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली व सिंग यांच्याकडील २० हजार रूपयाची रक्‍कम काढून घेतली.

सिंग यांनी दुसर्‍या दिवशी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe