अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- गेल्या काही महिन्यांपूर्वी शेवगाव तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांच्या घरात अतिवृष्टी व महापुरामुळे पाणी घुसले होते.
तसेच या पाण्यामुळे शेती पिके, पशुधन, संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते. मात्र अद्यापही तालुक्यातील नुकसाग्रस्तांना नुकसानीची भरपाई मिळालेली नाही.
अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा अजूनही सुरळीतपणे सुरू झालेला नसल्याने तो तातडीने सुरळीत व्हावा, आदी मागण्यांसाठी तालुका भाकप, राज्य किसान सभा यांच्यावतीने 25 जानेवारी रोजी वडुले बु. नदीच्या पुलावर रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात येणार आहे.
दरम्यान याबाबतचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हंटले आहे की, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे तालुक्यातील अनेक गावे बाधित झाली आहे. यावेळी लोकप्रतिनिधींनी केवळ शासकीय मदतीची आश्वासने दिली.
प्रशासनाने शेतकरी नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तालुक्याचा सविस्तर अहवाल शासन व प्रशासनाकडे सादर केला. त्यानुसार शासनाने तालुक्यासाठी नुकसान भरपाईची रक्कम मंजूरही केली.
मात्र या नुकसान भरपाईपासून अजूनही अनेक शेतकरी, नागरिक वंचित आहेत. दरम्यान प्रशासनाने मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकरी नागरिकांना न्याय देणे अत्यंत आवश्यक आहे.अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम