Bhandardara Dam Storage : अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागुन असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा पोहोचला ८० टक्क्यांवर

Ahmednagarlive24 office
Published:
Bhandardara Dam

Bhandardara Dam Storage : संपुर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागुन असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८० टक्क्यावर पोहचला असून भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ९ टीएमसी झाल्यात जमा झाला आहे. तर धरण क्षेत्रामध्ये अद्याप पावसाची संततधार सुरुच आहे.

अहमदनगर जिल्ह्याची शान समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये पावसाची संततधार सुरुच असून काल रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरण ८० टक्के भरले होते. ११०३९ दलघफु क्षमता असणाऱ्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८९९८ दलघफु झाला असून लवकरच धरणामध्ये ९ टीएमसी पाणी जमा होणार आहे.

घाटघर, रतनवाडी, साम्रद या तीन गावाबरोबरच आज संपुर्ण धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरुच होती. त्यामुळे भंडारदरा धरणामध्ये सातत्याने नविन पाण्याची आवक सुरु आहे. गत २४ तासामध्ये धरणात एकुण ३०४ दलघफु नविन पाणी आले. तर बारा तासामध्ये २०० दलघफु नविन पाणी जमा झाले असून विजनिर्माण केंद्रातुन ३५ दलघफु पाण्याचा विजनिर्मितीसाठी वापर होऊन ते नदीपात्रात विसर्जित होत आहे.

गत २४ तासात भंडारदरा येथे ४६ मिली मीटर पावसाची नोंद झाली असून घाटघर येथे १०४ मिली मीटर तर रतनवाडीला १०२ मिली मीटर पावसाची नोंद झाली. वाकी येथे ३१ मिली मीटर पावसाची नोंद झाली असून पांजरे येथे ८३ मिली मीटर पाऊस पडला. भंडारदरा धरण ८०.९८ भरले असून धरणाचा पाणीसाठा ८९९८ दलघफु झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe