अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-शेतकऱ्यांच्यादृष्टीने ही बातमी महत्त्वाची आहे. कारण आगामी काही दिवसांत राज्यात परत एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा ४ दिवस पाऊस पउण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. त्यामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हा अवकाळी पाऊस महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, ओदिशा, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटकचा काही भाग, तेलंगणा आणि तामिळनाडूत पडणार असल्याने या भागातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सध्या हवामान बदलाच्या परिस्थितीमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून बाष्प भूभागावर येईल, त्यामुळे हवामान बिघडून पाऊस पडू शकतो असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
जर या थंडीत पुन्हा अवकाळी पावसाचं आगमन झालं तर शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अवकाळी पावसाच्या शक्येतेने पुन्हा एकदा बळीराजा चिंतेत सापडला आहे.
तमिलनाडु, पुद्दुचेरी, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत यंदा पावसाचा जोर होता. आता परत एकदा फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा ४ दिवस पावसाचा अंदाज स्कायमेट या संस्थेने वर्तवला आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved