अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra News :- सध्या रब्बी हंगामातील पिके ही अंतिम टप्प्यात आली आसून त्यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांद्या बरोबरच द्राक्ष बागांचे ही आवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तर या निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना गेल्यावर्षीपासून करावा लागत आहे. आवकाळी पाऊस हा राज्यभरात टप्प्याटप्प्याने पडत असून नाशिक जिल्ह्यासह कोकण, मराठवाडा, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड या परिसरात अवकाळीने हजेरी लावली.
तर कोकणात पावसाने मुक्काम ठोकल्यामुळे आंबा काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 7 मार्चपासून वातावरणात बदल झाला आसून.
रब्बी हंगामाचा तोंडचा घास हिसकावला जाणार म्हणून शेतकरी चिंतेत होता तोच नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे द्राक्षे च्या घडाचे मोठे नुकसान झाले.
याचा परिणाम उत्पादन नक्कीच होणार आहे. तर कोकणातील आंबा, काजू बागांचे मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. शेतकर्याने वातावरण पाहून रब्बी हंगामातील पिकांची काढणी करून घ्यावी.
तर काही भागात ज्वारी पिकाची काढणी झाली असून. शेतकर्यांनी वेळ न घालवता ते सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था केली पाहिजे.
शिवाय पिकांवर पाऊस पडण्याच्या आधी किटकनाशकांची फवारणी करावी असे तज्ञ रामेकृषिश्वर चांडक यांनी सांगितले.