Rahul Gandhi : काँग्रेसच्या शेगावमधील सभेकडे अख्या महाराष्ट्राचं लक्ष ! पवार-ठाकरे उपस्थित राहणार का? काँग्रेसच्या नेत्यानं सांगितलं…

Published on -

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. सध्या राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते या सभेमध्ये सामील होणार की नाही यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील शेगाव या ठिकाणी १८ नोव्हेंबरला पोहोचणार आहे. शेगाव येथील सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या दिवशी काँग्रेसकडून मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते. मात्र काही कारणास्तव आता ते सभेला उपस्थित राहणार नसल्याचे सगण्यात आले आहे. मात्र काँग्रेसकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

आता शेगाव येथील सभेला महाविकास आघाडीतील किती नेते सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गांधी-पवार-ठाकरे हे एका मंचावर दिसणार का? असे प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडले आहेत.

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. शेगाव येथील सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे येणार का.. याबाबतीत शिक्कामोर्तब झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 19 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन असल्याने त्यांच्या समाधीवर सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत… त्याचबरोबर बुलढाणा मध्ये रात्रीच्या विमान उड्डाणासाठी व्यवस्था नसल्याने, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे शेगावच्या सभेला उपस्थित राहण्यासंदर्भात निश्चित झाले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा १० वा दिवस आहे. आज वाशीम शहरातून या यात्रेला सुरुवात झाली आहे. सकाळी ६ वाजता या यात्रेत तरुण आणि काँग्रेस कार्यकर्त्ये सहभागी झाले आहेत.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये तरुणाचा सहभाग वाढताना दिसत आहे. १८ नोव्हेंबर ला राहुल गांधी बुलढाण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News