अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- संसदेचे हिवाळी अधिवेशन आज (सोमवार, २९ नाेव्हेंबर) सुरू होत आहे. 23 डिसेंबरपर्यंत अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या वीस बैठका होतील.
नियमित कामकाजाशिवाय सव्वीस नवी विधेयके मांडली जाणार आहेत. शेतीविषयक तीन वादग्रस्त कायदे केंद्र सरकारने संसद अधिवेशनाआधीच मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा प्रस्ताव संसदेत मांडला जाणार आहे. याशिवाय किमान आधारभूत मूल्य (एमएसपी), पेगासस हेरगिरी, देशातील वाढती महागाई,
इंधनाचे वाढते दर, वाढती बेरोजगारी आदी प्रमुख मुद्देही गाजण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी विरोधी पक्षांचे नेते आग्रही आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल प्रथेप्रमाणे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक केंद्र सरकारने बोलावली होती.
ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. बैठकीला सर्व विरोधी पक्षांचे 31 राजकीय पक्षांचे 42 नेते उपस्थित होते. मात्र पंतप्रधान मोदी बैठकीला उपस्थित नव्हते.
त्यामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या अधिवेशनात (एमएसपी)हमीबाबत कायदा आणण्याचा व बीएसएफच्या अधिकारक्षेत्राचा विस्तार इ.मुद्दे उपस्थित केले.
मात्र सर्वपक्षीय बैठकीत सरकार कोणत्याही सदस्याला बोलू देत नाही, असा आक्षेप आआपा खा. संजय सिंह यांनी केला. त्यानंतर आम आदमीचे नेते संतप्त होऊन बैठकीतून बाहेर पडले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम