अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- डाँ.तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांचे गेल्या पाच दिवसा पासुन उपोषण सुरु असुन व्यवस्थापन मंडळ व शासकीय अधिकारी मागण्या मान्य करण्यास असमर्थ असल्याचे दिसत असल्याने सोमवार दि.30 रोजी उपोषण आंदोलनात सहभागी झालेले कामगार कारखान्याशी सलग्न असणाऱ्या सरकारी कार्यालयात जावून आत्मदहन करणार आहे.
आत्मदहन करताना शासकीय कार्यालयात उपस्थित असलेल्या आधिकाऱ्यांना मिठी मारणार असल्याचे उपोषणकर्ते बाळासाहेब तारडे यांनी सांगितले. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या गेल्या ५ दिवसांपासून उपोषण सुरू असून या उपोषण दरम्यान कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक मंडळातील संचालक,
चेअरमन नामदेवराव ढोकणे यांनी उपशांकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली परंतु चर्चा निष्फळ ठरली दरम्यान शुक्रवारी कामगार आयुक्त कार्यालयाचे बोरसे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली परंतु कामगार आयुक्त कार्यालयाचे बोरसे यांनी ठोस असा कोणताही निर्णय न सांगितल्याने कामगार आयुक्त बोरसे व उपोषणकर्त्यांमध्ये खडाजंगी झाली यावेळी उपशांकर्त्यांनी सर्व शासकीय अधिकारी तनपुरे कारखान्याचे सर्वेसर्वा खा.डॉ.सुजय विखे हे सांगितल्याप्रमाणेच उपोशनकर्त्यांना उत्तरे देत आहेत.
त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी ठोस निर्णय देणार असेल तरच उपोषणस्थळी भेट द्यावी असे कामगारांनी सांगितले छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कामगारांच्या मागण्या जाणून घेतल्या यावेळी वाघ यांनी कामगार आयुक्त यांना दोन दिवसात तुमचा निर्णय द्या कामगारांचा अंत पाहू नका नाहीतर छावा संघटना कामगारांच्या बाजूने आंदोलनात उतरेल कामगार आयुक्त कार्यालये पेटून देण्याचे आंदोलन हाथी घेईल असा इशाराही कामगार आयुक्त बोरसे यांच्या समक्ष वाघ यांनी दिला आहे.
कामगार आयुक्तांनी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना नोटीसी द्वारे उपोषणाची दखल घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचे सूचना दिल्या होत्या.परंतु कारखाना कार्यकरी संचालकाने त्याची दखल घेतली नसल्याचे कामगारांसमोर सांगीतले त्यामुळे कामगारांच्या भावना अधिक तीव्र झाल्या. उपोषण कर्त्यांनी शनिवार पासून डॉ. तनपुरे करखान्याशी सलंगन असलेल्या सर्व संस्थेचा कारभार सभासदांसमोर मांडणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी उपोषणकर्त्यांच्या वतीने बाळासाहेब तारडे यांनी सांगितले की उपोषणाचा ५ वा दिवस असून आमची दखल कोणी घेत नाही. आता आम्हीच दखल घेण्यास सुरुवात केली असून सोमवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी उपोषणात सामील झालेले कामगार कारखान्याशी संलग्न असलेल्या सर्व शासकीय कार्यालयात जाऊन आत्मदहन करणार आहे. आत्मदहन करताना शासकीय कार्यलयात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला मिठी मारून आत्मदहन करणार आहे. आम्ही उपोषण करून मरणार आहोतच आत्मदहन करून शासकीय अधिकाऱ्याला घेऊन मरु असे तारडे यांनी सांगितले.
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घेतली भेट
उपोषणास बसलेल्या कामगारांची आज सायंकाळी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी उपोषणस्थळी येऊन भेट घेतली. मिटके यांनी भेटीदरम्यान उपोषणास बसलेल्या कामगारांच्या प्रकृतीची चौकशी करून उपोषण लवकरात लवकर मागे घेण्यासंदर्भात पोलीस विभागाच्या वतीने विनंती केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम