अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. तसेच वाढत्या लसीकरणामुळे याचा प्रादुर्भा कमी होताना दिसून येत आहे.
यातच अनेक तालुक्यांची वाटचाल हि कोरोनमुक्तीच्या दिशेने सुरु आहे. शेवगाव तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने घट होत असून तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.
शेवगावकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. दरम्यान शेवगाव तालुक्यातील ४९ गावांतील कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आली असून ती गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
शेवगाव शहरासह ६४ गावांत कमी-जास्त प्रमाणात सक्रिय रुग्ण आहेत. शेवगाव शहरात सर्वाधिक ६० तर दहिगावने १६, भावी निमगाव १२, आव्हाणे व भातकुडगाव प्रत्येकी १० रुग्ण आहेत.
राजणी ९, बोधेगाव, नजीक बाभूळगाव प्रत्येकी ७, हातगाव ६ तर इतर आठ गावांत प्रत्येकी ५, सहा गावांत प्रत्येकी ४, तेरा गावांत प्रत्येकी ३, नऊ गावांत प्रत्येकी २, तर उर्वरित १९ गावांतील प्रत्येकी १ रुग्ण उपचार घेत आहे.
तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच शेवगाव व बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत एकूण १ लाख ३४ हजार ९५ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.
तसेच आपले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी, निकषात बसणाऱ्या ज्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे, त्यांनी लसीकरण करून घ्यावे.असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम