Ahmednagar News : वेदांताच्या मुद्द्यावरून राज्यातील गुंतवणूक बाहेर गेली असे त्यांचे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. नाणारच्या पापाचे धनी कोण ? नाणार रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातून का गेला, याचे उत्तर ठाकरेंनी दिले पाहिजे.
नाणार रिफायनरी घालवण्याचे पाप कोणी केले? त्यांनी राज्यातील गुंतवणूक बाहेर जाते म्हणणे म्हणजे चोराच्याउलट्या बोंबा आहेत. अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर केली.

महसूलमंत्री ना. विखे यांनी नगरमध्ये काल पत्रकारांशी बोलताना केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. मागील अडीच वर्षात आघाडी सरकारच्या माध्यमातून समाजाला आधार देण्याचे काय काम केले, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे.
तसेच वेदांताच्या मुद्द्यावरून विद्यमान राज्य सरकारवर करीत असलेल्या टीकेकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे पाटील म्हणाले, नाणार रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातून का गेला, याचे उत्तर ठाकरेंनी दिले पाहिजे.
त्यांनी अगोदर माहिती करून घेतली पाहिजे, असे सांगून विखे म्हणाले, नाणार रिफायनरी घालवण्याचे पाप कोणी केले? त्यांनी राज्यातील गुंतवणूक बाहेर जाते म्हणणे म्हणजे चोराच्याउलट्या बोंबा आहेत.
ज्यांनी प्रकल्प घालवले,त्यांच्या तोंडी राज्य सरकारवर आरोप शोभत नाहीत. किंबहुना तो पोरकटपणा आहे. वेदांता प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट खुलासा केला आहे.
हा प्रकल्प गुजरातला महाविकासआघाडी सरकारच्या निष्क्रीयतेमुळेच गेला आहे. मागच्या अडीच वर्षात त्यांनी राज्यात किती गुंतवणूक आणली, असे विचारले तर त्याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. वेदांताचा विषय मागील सात-आठ महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे तो राज्यातून बाहेर जाणे, हे मागच्या सरकारचे पाप आहे. अशी टीका केली.